भारतीय बौद्ध महासभेकडून संविधान दिन उत्साहात साजरा.
भडकलगेट येथे ७६ व्या संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी :भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेमार्फत भडकलगेट परिसरात 76 वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे केंद्रीय विश्वस्त डॉ. राजाराम बडगे, राज्य संघटक किशोर जोहरे, महानगर अध्यक्ष रमेश बनसोडे, महिला जिल्हा अध्यक्षा गंगाताई सुरडकर, सरचिटणीस भास्कर म्हस्के, तेजस्विनी तुपसागर (सरचिटणीस), कर्नल अनिल राऊत, शाखा अध्यक्ष, महिला शाखा अध्यक्षा, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्त्वांवर आधारित समाज निर्माण करण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली. भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही संविधान दिन साजरा करून बाबा साहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.



