शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह वंचितचे कार्यकर्ते मुंबईला धडकणार, भाऊराव गवई.
२५नोव्हेंबर २०२५रोजी
चलो मुंबई , छत्रपती शिवाजी पार्क संध्याकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क.मुंबई आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे माध्यमातून मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी संविधान सन्मान सभेचे आयोजन केले आहे तरी सर्व शोषित वंचित बहुजन समाजाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या सभेला अवश्य यावे.
दिनांक २५ नंबर २०२५ रोजी सकाळी सात वाजता क्रांती चौक औरंगाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून शेकडो गाड्यांचा ताफा संविधान सन्मान सभेसाठी मुंबईकडे रवाना होणार.
या सभेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी सर्व संविधान प्रेमी आंबेडकरवादी बहुजनांना नम्र निवेदन करण्यात येत आहे की त्यांनी रेल्वेने, आपापल्या वाहनाने छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे मुंबईला पोहोचावे. रेल्वे स्थानकावर सभेचे पूर्ण वेळ बॅच बिल्ला याची व्यवस्था केलेली आहे. टोलनाके फ्री करावे अशा आशयाचे पत्र पदाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.या सभेला वंचित बहुजन आघाडीजिल्हा, तालुके, शहर (पूर्व, पश्चिम, मध्य)कार्यकारणी,युवा आघाडी ,महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, कामगार आघाडी, विद्वत सभा ,समता सैनिकदल ,तसेच भारतीय बौद्धमहासभा पदाधिकारी, कार्यकर्ते ,सहभागी होणार आहेत.



