- मनपा शाळेतील विद्यार्थी देणार विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेटछ,त्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री जी. श्रीकांत (IAS) यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “Smart School to Best School” या उपक्रमांतर्गत 2024–25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवीतील 1100 विद्यार्थ्यांसाठी “Smart Exam” घेण्यात आली होती. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक ज्ञान आणि विचारक्षमतेच्या विकासावर आधारित होती.
परीक्षेसाठी 600 बहुपर्यायी प्रश्नांचा प्रश्नसंच तयार करण्यात आला होता. तीन महिन्यांत विद्यार्थ्यांनी या आधारे अभ्यास केला. शिक्षक आणि पालकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. परीक्षेचे नियोजन MOSC पद्धतीनुसार करण्यात आले.
शाळास्तरावरील पहिल्या टप्प्यातून 10% विद्यार्थी मनपा स्तरावरील मुख्य परीक्षेस पात्र ठरले. त्यातून टॉप 10 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले गेले. या विद्यार्थ्यांना केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO), तिरुअनंतपुरम येथे भेट देण्याची संधी मिळाली आहे.
आयुक्त श्री जी. श्रीकांत यांनी इस्रो अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी विनंती केली होती. त्यानुसार 17 नोव्हेंबर 2025 रोजी स्पेस सेंटर भेट निश्चित झाली असून 11 विद्यार्थी व शिक्षकांचे प्रतिनिधीमंडळ या शैक्षणिक दौर्यावर जाणार आहे.
या निमित्ताने आज आयुक्तांनी विद्यार्थ्यांना जलश्री निवासस्थानी बोलावून शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले, नाश्ता देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
तसेच आयुक्तांनी पुढील वर्षी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांसाठीही अशीच “Smart Exam” घेण्याच्या सूचना दिल्या.
- या वेळी शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, तसेच उमा पाटील, सविता बांबर्डे, मंगेश जाधव, किरण तबडे हे शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



