(छत्रपती संभाजीनगर दि २१)
त्रिरत्न बुद्धिस्ट ट्रस्टचे त्रिरत्न महाविहार, देवळाई परिसर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन भिक्खु संघपालो यांचा वर्षावासाची सांगता आणि ग्रंथवाचन समाप्ती धम्म सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी धम्मपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष
अखिल भारतीय भिक्खु संघाचे अनुसंघनायक तथा लोकुत्तरा महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष भदंत बोधिपालो महाथेरो,भदंत काश्यप महाथेरो, भदंत नागसेन थेरो,भदंत राहुल थेरो, भिक्खु विनयशील, भिक्खु संघपालो यांच्यासह भिक्खु संघाची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख धम्म देसना भदंत बोधिपालो महाथेरो यांची झाली. ते म्हणाले पंचशील हे निसर्गाचे नियम आहेत. आयुष्य सुखकर होण्यासाठी दैनंदिन जीवनात पंचशीलाचे आचरण केले पाहिजे. जीवन कसे जगावे हे पंचशीलाची शिकवण आहे.पंचशीलाच्या तत्वाने माणुसकी वृद्धिंगत होते. आपल्या चित्तात प्रेम मैत्री दया, क्षमा शांती बंधुभाव वाढवा. ही ताकद पंचशीलात आहे. तथागतांचा धम्म हा सबंध सजीव सृष्टीसाठी आहे. भिक्खु संघ हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. समाजातील आध्यात्मिक दृष्टी विकसित करण्याचे महत्तम काम भिक्खु संघ करतात.समाजाला घडवण्यासाठी,जगातील शांती टिकण्यासाठी तथागतांनी आपल्याला पंचशील दिले आहे. शील हे जीवनाचे उद्धार करणारे वैश्विक तत्व आहे.जगातील सगळ्या देशातील राज्यघटना ह्या पंचशीलावर आधारित आहेत.भदंत काश्यप महाथेरो यांनीही बुद्ध धम्मातील श्रद्धेचे महत्व विषद केले. भदंत राहुल थेरो, नागसेन थेरो यांचीही धम्म दिसना झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अरुण चंदनशिवे यांनी तर आभार सुभाष चौथमल यांनी मानले.यावेळी ॲड एन जी चक्रनारायण,मिलिंद दांडगे, डी जी चक्रनारायण,ॲड वसंतराव शेजुळ, कारभारी पगारे, संजय दिवेकर, अशोक तिनगोटे, शंकर शिंदे,आसाराम गायकवाड,अरविंद अवसरमोल,भीमराव वेव्हळ,गौतम वानखडे, हिरामण साळवे, डॉ सुनील तायडे संगीता पाखरे, ज्योती चक्रनारायण, शांताबाई वानखडे, मीना दांडगे, सुजाता तायडे, रमाबाई जगताप आदींसह छत्रपती संभाजीनगर येथील उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी त्रिरत्न बुद्धिस्ट ट्रस्टचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.



