कला महाविद्यालयामध्ये भारताचे माजी महामहीम राष्ट्रपती स्व. शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. नितीन आहेर होते तर डॉ. पठाण सर डॉ मोसिन सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले सूत्रसंचालन अण्णासाहेब थिटे सरांनी अतिशय खेळीमेच्या वातावरणात केले त्यांनी सूत्रसंचालन करताना आज जगातील कोणतीही ग्रंथ हा मानवासाठी प्रेरणादायी ठरतो हे पटवून सांगत असताना साहित्य आणि जीवन यांचा निकटचा संबंध कसा आहे. ग्रंथपाल डॉ. अंजली काळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रास्ताविक करत असताना ग्रंथालयाशी आपले नाते कशे जोडले जाते आणि ग्रंथालयातून माणूस वैचारिक परिपक्व कसा होतो आणि एक पुस्तक हजार मित्रा बरोबर राहिल्यासारखे व बरोबरी केल्यासारखे असते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. रामकिशन मुंडे यांनी ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी असेही सांगितले की आपली जर वाचनाची इच्छाशक्ती असेल आणि तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर व्यक्तीच्या जीवनाचे अनेक पैलू उघडायला वेळ लागत नाही. अध्यक्षीय भाषणात प्रो. डॉ. नितीनजी आहेर म्हणाले की, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र युवापिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे. तर आभार प्रदर्शन श्री. आंधळे सर यांनी केले. तसेच कयूम भाई नसीर भाई आणि विद्यार्थी उपस्थित होते.



