- छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
२४ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर फुले–शाहू–आंबेडकरांचा जयघोष घुमणार आहे!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनुवादी विचारसरणीविरुद्ध आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी वंचित बहुजन आघाडीने “जनआक्रोश मोर्चा”ची घोषणा केली आहे.
हा ऐतिहासिक मोर्चा क्रांती चौकातून निघून RSS कार्यालय, बाबा पेट्रोल पंप येथे संपन्न होईल.
शांततापूर्ण पण प्रखर निषेध! शहरात दुमदुमणार घोष
️ “मनुवाद नाही चालणार — फुले, शाहू, आंबेडकर चालणार!”
राहुल मकासरे प्रकरणानंतर पेटला वंचितांचा आक्रोश
औरंगाबाद पश्चिमचे वंचित युवा अध्यक्ष राहुल मकासरे यांनी शासकीय तांत्रिक महाविद्यालयासमोर उभारलेल्या RSS नोंदणी स्टॉलचा निषेध केला होता.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, राहुल मकासरे,विजय वाहूळ सह आठ कार्यकर्त्यांविरुद्ध अनेक गंभीर, अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.!
IPC कलम 189(2), 190, 299, 296, 352, 351(2) आणि IT कायद्याचे कलम 67 लागू.
यामुळे वंचित समाजात प्रचंड रोष आणि संतापाचा स्फोट झाला आहे.!
“संघ वंचितांना घाबरतो!” अॅड. प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी X (ट्विटर) वर थेट हल्ला चढवला
“मनुवादी RSS ला फुले–शाहू–आंबेडकरांचा विचार सहन होत नाही.राहुल मकासरेवरील गुन्हे हे पोलिस मनुवादाचे जिवंत उदाहरण आहे.वंचित बहुजन आघाडी राहुलसोबत खंबीरपणे उभी आहे.”संघ वंचितांना घाबरतो, कारण आमच्याकडे फुले, शाहू आणि आंबेडकरांचे सत्य आहे”
“हा एका व्यक्तीचा नव्हे, विचारांचा लढा आहे! अमित भुईगळ
क्रांती चौक येथे पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत युवा नेते अमित भाऊ भुईगळ यांनी घोषणा केली “हा मोर्चा केवळ राहुल मकासरेवरील अन्यायाचा निषेध नाही,तर संपूर्ण देशात वाढत चाललेल्या मनुवादी प्रवृत्तीविरुद्ध विचारांचा एल्गार आहे. फुले–शाहू–आंबेडकरी विचारांच्या सर्व संघटना एकत्र येत आहेत.”
ते म्हणाले, “RSS ने समाजात जातिवादाचं विष पसरवलं.आम्ही संविधान, समानता आणि न्यायासाठी लढत आहोत.हा मोर्चा लोकशाही आणि अहिंसेचा नवा अध्याय लिहिणार आहे.”
⚫ मोर्चाचा मार्ग व आयोजन तपशील
सुरुवात: क्रांती चौक (छत्रपती शिवाजी महाराज स्मारक)
शेवट: RSS कार्यालय, बाबा पेट्रोल पंप
वेळ: दुपारी १२.०० वा.
️ स्वरूप: शांततामय, संविधाननिष्ठ, अहिंसक जनआंदोलन
पत्रकार परिषदेला उपस्थित नेते
अमित भाऊ भुईगळ, सतीश गायकवाड, योगेश बन, तय्यब जफर, रुपचंद गाडेकर, संदीप जाधव, पंकज बनसोडे, सतीश शिंदे, माजी नगरसेवक जावेद कुरेशी, मिलिंद बोर्डे, अक्रमभाई, रामेश्वर तायडे, पी. के. दाभाडे, बाबासाहेब दुशिग, पंडीत तुपे, वंदना नरवडे, भाऊराव गवई, प्रविण जाधव आणि राहुल मकासरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित.
“मनुवादाच्या विरोधात एल्गार आता गप्प राहणार नाही फुले–शाहू–आंबेडकर समाज!”
हा मोर्चा म्हणजे वंचितांचा वैचारिक आवाज, सामाजिक न्यायाचा एल्गार, आणि मनुवादाविरुद्धचा निर्धार!
देशातील प्रत्येक फुले–शाहू–आंबेडकरी कार्यकर्त्याला आवाहन —
✊ “गप्प राहणं म्हणजे अन्यायाचं समर्थन.!



