मुंबई प्रतिनिधी १४ ऑक्टोबर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील एकूण नऊ शिक्षण संस्था आणि दोन वसतिगृहांचे अद्ययावतीकरण, जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे.
या कामांसाठी पुढील पाच वर्षांच्या कालावधीत दरवर्षी १०० कोटी रुपये या प्रमाणे एकूण ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांना दर्जेदार शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
या निर्णयामुळे डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक स्वप्नाला नवी दिशा आणि बळ मिळणार आहे.



