अलीकडेच भारतातील औषध नियंत्रण प्राधिकरणांनी Coldrif Cough Syrup या खोकल्याच्या सिरपवर विक्री आणि वितरण बंदी घातली आहे. काही बॅचमध्ये Diethylene Glycol (DEG) नावाचा विषारी रासायनिक घटक आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. हा घटक अत्यंत घातक असून, विशेषतः मुलांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे, मज्जासंस्था बिघडणे यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. Coldrif Syrup हे खोकला आणि सर्दीसाठी सर्वसामान्य वापरले जाणारे औषध आहे. डीईजी हा दूषित घटक प्रामुख्याने ग्लिसरीनच्या उत्पादन प्रक्रियेत अयोग्य नियंत्रणामुळे मिसळला जातो. महाराष्ट्रात एफडीएने सार्वजनिक इशारा देत Coldrif Syrup Batch SR -13 परत करण्याचे आणि वापर टाळण्याचेआवाहन केले आहे.
Diethylene Glycol ( DEG) म्हणजे नेमकं काय हे आपण सविस्तर बघणार आहोत.
रासायनिक नाव: Diethylene Glycol
रासायनिक सूत्र: C₄H₁₀O₃
आण्विक वजन: 106.12 g/mol
स्वरूप: रंगहीन, गंधरहित, गोड चवीचा द्रव
विलयनशीलता: पाण्यात पूर्णपणे विरघळणारा.
Diethylene Glycol चा उपयोगा औद्योगिक वापरासाठी होतो. जसे की अँटीफ्रीज तयार करण्यासाठी,ब्रेक फ्ल्यूड्स व पेंट्स मध्ये, प्लास्टिक आणि रेजिन उत्पादनात. हे घातक DEG सैराट गेल्यावर मोनो एथिलिन ग्लायकोल सारखा चयापचय होतो. नंतर हे रूपांतर ग्लायकोलिक ऍसिड आणि ऑक्सालिक ऍसिड मध्ये होतं. जे मूत्रपिंड यांना आणि पोहोचवतात रक्तामध्ये मेट्रोलिक ऍसिडोसीस निर्माण होते म्हणजे PH कमी होतो. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन विघडतं आणि मेंदू व नर्व्हस सिस्टीमवर याचा परिणाम होतो.
फार्मासिस्टची भूमिका:
फार्मासिस्टची या संकटात प्रमुख भूमिका बजावतात.
दूषित बॅच ओळखणे आणि स्टॉक मधून काढणे,ग्राहकांना माहिती देणे आणि वापर टाळण्यास सांगणे, असामान्य प्रतिक्रिया नोंदवणे, सुरक्षित उत्पादनाची खात्री करणे, जनजागृती करणे, भारत उपलब्ध पर्याप्त सुरक्षित कफ सिरप सुचवणे, गुणवत्ता तपासणी करणे आणि महत्त्वाचं औषधांच्या घटकांमध्ये बदल किंवा रिकॉल अलर्ट मिळाल्यास त्वरित कारवाई करणे.
कोणतेही औषधे स्वतःच्या मनाने घेऊ नये डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच स्वतः आणि लहान मुलांना औषधे देणे. लहान मुलांना सहसा घरगुती उपायाने बरे करावे जसे जास्त सर्दी खोकला साठी वाफ देणे,गरम पाणी ,पुरेसे पाणी पिणे आणि योग्य आहार घेणे. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,सतर्क रहा.
– प्राची बाळू जाधव
फार्मासिस्ट
छत्रपती संभाजीनगर



