डॉ शहाजी चंदनशिवेम राठवाडा प्रतिनिधी परंडा दि . ३ :- चव्हाणवाडी (खासापूरी ) ता. परंडा येथील रहिवासी असलेले व कळंब येथील पंचायत समितीमध्ये अंशकालीन कर्मचारी सुधीर नवनाथ देडगे हे कळंब येथे कार्यरत होते . दि २ आक्टोबर रोजी चव्हाणवाडी येथील राहत्या घरी आईला भेटून परंडयाकडे आपल्या मुलाला घेऊन येत असताना एमएच 23 N 5236 या बोलेरो गाडी व सुधीर देऊगे यांच्या एम एच AC 0177 या मोटार सायकलची समोरासमोर जोरात धडक झाली आणि सुधीर देडगे यांचा जागीच मृत्यु झाला. त्याला मुलगा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी बार्शी येथे पाठववल्याचे समजते . सुधीर देडगे यांच्या घरची परिस्थिती नाजूक असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्य असून मुलगाही गंभीर जखमी झाला आहे . दि ३ रोजी दुपारी १.०० वाजता सुधीर देडगे यांचा अंतःविधी पार पडला . सुधीर देडगे यांच्या अंत्यविधीसाठी परंडा शहर व तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मुलगा मात्र उपचारासाठी बाहेरगावीच आहे . अत्यंत वाईट दुर्गघटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .



