कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)समाजसेवा, शिक्षण, कला आणि विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळा ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील अग्रवाल कॉलेज येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी थाटात संपन्न झाला.
१३८ समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला.
या प्रतिष्ठित सोहळ्याचे आयोजन इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचे मुख्य तपासी अधिकारी रामजीत उर्फ जितू गुप्ता आणि सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनच्या शितल पाटील यांनी केले होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून समाजसेवक, शिक्षक, कलावंत आणि विविध सामाजिक कार्यात कार्यरत असलेले मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी, १३८ समाजसेवकांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये इंडियन आर्मीचे सुभेदार कॅप्टन महेंद्र गवई सर, एडिशनल कमिशनर जी.एस.टी पुणे साळुंखे सर, हिंदू रक्षक संदीप शर्मा सर, शकुंतला तायडे मॅडम, उद्योजिका सुमित्रा पाटील मॅडम, अभिनेत्री साक्षी नाईक, विजय वाघेला सर, काजल सुर्वे मॅडम, समाजसेविका मेहरुजीम खान मॅडम, व डॉ. अनिता गुप्ता यांचा समावेश होता. या सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम
या भव्य सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी रामजीत गुप्ता, शितल पाटील, माणिक पाटील, तुकाराम पाटील, रवी वासवानी, राजकुमारी गुप्ता, शारदा पाटील, उर्मिला कदम, सुरेश कदम, दिपाली पाटील, केतन साळगावकर, गोरखनाथ कदम, पिंकी सौदा, सोनाली सोनवणे, स्नेहा थोरात, स्नेहल ओवाल, महेश गुप्ता, रेश्मा कदम, मुकेश गुप्ता, दीपक गुप्ता, केतन म्हात्रे, सुशीला हांडे, चैताली पाटील, अनिरुद्ध जैस्वार व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष हरी आल्हाट आणि इतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या मान्यवरांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल रामजीत ( जितू ) गुप्ता यांचे सर्वानी भरभरून कौतुक केले.



