“सनातनचा अपमान सहन करणार नाही” असं म्हणत सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, तर संविधान, न्यायसंस्था आणि सत्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे.आज स्पष्ट दिसतंय,तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात,कितीही उच्च शिक्षित, न्यायप्रिय किंवा प्रामाणिक असलात,पण जर तुम्ही मागासवर्गीय समाजातून किंवा बौद्ध समाजातून आलात,तर या जातवादी व्यवस्थेत तुमची किंमत “शून्य” ठरवली जाते! हेच वास्तव आहे,धम्म, समानता, आणि न्याय यांची शपथ घेऊन या देशाची सेवा करणाऱ्यांवरच आज हल्ले होत आहेत. आणि हे सर्व करताना “धर्माच्या रक्षणा”चं ढोंग करणारे लोक खऱ्या अर्थाने संविधानद्रोही आहेत! सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. समाज आता गप्प बसणार नाही.सत्य आणि न्यायावर विश्वास ठेवणारा प्रत्येक भारतीय आज तुमच्या सोबत उभा आहे.हा हल्ला फक्त एका न्यायाधीशावर नाही,तर बाबासाहेबांच्या विचारांवर, बुद्धाच्या करुणेवर आणि समतेच्या संविधानावर आहे.! येथे सरन्यायाधीश जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य सुरक्षित कसे…?



