निळे प्रतिक न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजी नगर दि. २१, साकेत बुद्ध विहार, साकेतनगर, भावसिंगपुरा येथे महाकवी वामन दादा ची १०२ वी जयंती व स्वातंत्र्य दिन निमित्त कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमा चे वक्ते प्रा सुनील दाभाडे हे होते व अध्यक्ष स्थानी इंजि. भास्कर म्हस्के होते.भीम बुद्ध गीतांचा बादशहा, शीघ्र कवी, चळवळीला आयुष्य अर्पण करीत भीम गजर जन्मानसात रुजवणारा अस्सल कार्यकर्ता, बाबासाहेबांची चळवळ एकनिष्ठतेने ऊन पाऊस पायी, बैलगाडीने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश पर्यंत भीम मशालीची ज्योत तेवत आपल्या कवन गायनच्या माध्यमातून समजप्रबोधन करणारे वामन सारखा अष्टपैलू हिरा होणे नाही, हयातभर कुटुंब वाऱ्यावर सोडून पायाला भिंगरी बांधून समाजाचं प्रबोधन करीत अनेक अव्वल दर्जाचे कवी, गायक कलाकार शाहीर त्यांनी घडविले. प्रतापसिंग बोदडे, समदूर सारंग,. नागसेनदादा सावदेकर, कवी विजयानंद जाधव, बाबुराव जाधव, रतन भालेराव,गायक मानस पुत्र शाहीर गौतम जाधव, मेघानंद जाधव शाहीर गवई,राहुल अन्वीकर, साहेबराव येरेकर, यांनी आपल्या गुरुची प्रबोधनाची परंपरा चालू ठेवत नव्या पिढीचे ताकतीचे गायक कवी कलाकार निर्माण केले त्यामुळेच चळवळीला बळ मिळत आहे. वामन दादाची काव्य संपदा हि भारतातील कोणत्याही तत्कालीन ज्ञान पंडिताच्या बुद्धी समान असूनही त्यांची दखल शासनाला घेता आली नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सुमारे १०,००० गीत कवणाचा संग्रह मुखपाठ असलेला, असा हा अवलिया कलंदर गीतकार, संगीतकार, प्रबोधनकार, आंबेडकर चळवळीचा भाष्यकार यांच्या पुतळ्यासाठी छत्र पती संभाजी नगरात भव्य पुतळा येत्या काही दिवसात महानगर पालीकच्या वतीने व शाहीर गौतम जाधव यांच्या वर्षनिवर्षा च्या पाठपुराव्याने उभा राहत आहे हि बाब आंबेडकरी व दादाला मानणाऱ्या बहुजनांना भूषणवाह असेल यात शंका नाही.ज्या प्रमाणे संत तुकोबा नी विठ्ठल रुपी बुद्ध आपल्या अभंगागातून जन्मानसात रुजवला त्याप्रमाणे वामन दादांनी डॉ बाबासाहेब व बुद्ध दिनदुबळया समाजात पोहचवला. दादांनी चित्रपट गिते(सांगते ऐका0 लिहली,, हुमा नामक चित्रपटात भूमिका केली, पण प्रबोधनाचा वसा घेतलेला वामन तिथे रमला नाही.साधी सोपी मनाला भिडणारी गीत रचना करीत आपल्या आवाजाने समाज प्रबोधन वयाच्या ८१वर्षा पर्यंत हा दिपस्तंभ तेवत राहिला. त्यांच्या स्मृतीला आज जन्मदिनी शतशःनमन. सदर जयंती व स्वातंत्र्य दीना कार्यक्रम निमित्त ऍड. भीमराव मस्के यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाप्रति योगदान व संविधान कलम वार आपले विचार मांडले, अध्यक्ष यांनी भीमा तुझ्या मताचे हे गीत गात वामन दादांना गीतांजली रुपी अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्र प्रा रामप्रसाद डोंगरे तर आभार सुभाष साबळे यांनी केले. सुरवातीस आदर्श पूजा, त्रिसरण घेत धम्म पालन गाथा व राष्ट्र गीताने कार्यक्रम संपन्न झाला.. कार्यक्रमाला परिसरातील, समितीचे पदाधिकारी, साकेतनगर मधील उपासक, उपासिका उपस्थित होते.



