कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात सद्भावना दिन उत्साहात साजरा
परभणी (दि. २० ऑगस्ट) – कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज सद्भावना दिन उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
नूतन विद्यामंदिर शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा. हेमंतराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सत्कारमूर्ती मा. हेमंतराव जामकर यांचा सौ. दिपलक्षमीताई जामकर यांच्या समवेत सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. किरणराव सुभेदार होते. मा. सौ. कविताताई सुभेदार, संचालक डॉ. अभयजी सुभेदार, डॉ. संजयजी टाकळकर, ॲड. मंगेशराव सुभेदार, ॲड. बाळासाहेब जामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. संगीता आवचार यांनी प्रास्ताविक केले. मा. अध्यक्ष जामकर साहेब व मान्यवरांच्या हस्ते नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन, वृक्षारोपण, विद्यार्थीनींना गणवेश वाटप, भित्तीपत्रकाचे प्रकाशन तसेच सद्भावना शपथ घेण्यात आली.
विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी महा ब्लड लॅब, परभणी यांच्या सहकार्याने मोफत रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा ६५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी महा ब्लड लॅबचे समन्वयक सिद्धार्थ सोनकांबळे, मयुरी गायकवाड, विजेंद्र गायकवाड, सूरज इसलकर, अभय काळे यांनी सेवा बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. अरुण पडघन यांनी केले, तर सर्व उपक्रमांचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नसीम बेगम अब्दुल सलीम यांनी केले.



