संभाजीनगर : दि. २० राजीव गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करमाड येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राजीव गांधी जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रा. मनोज देवकर यांचे “डिजिटल इंडियात राजीव गांधींचे योगदान” या विषयावर विशेष व्याख्यान ठेवण्यात आले होते. यंत्रयुगात जी प्रगती झाली त्यात राजीव गांधी यांचे योगदान मोठे होते अशी भूमिका त्यांनी मांडली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. मुळे हे अध्यक्ष समारोप करताना म्हणाले राजीव गांधीनी एकवीसाव्या शतकाकडे पाहताना जागतिक परिवर्तन डोक्यात ठेवून काम केले होते. सुरुवातीला एन एस एस प्रमुख डॉ. कालिदास फड यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. नितीन मुळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. अमित राऊत यांनी केले. या जयंती निमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या..
कार्यक्रमानंतर एन एस एस विभागातर्फे महाविद्यालयात वृक्षलागवड करण्यात आली. यासाठी डॉ. नरेश डहाळे, डॉ. अश्विनी कुमार चिंचोलिकर,डॉ. लक्ष्मण दांडगे, डॉ जयश्री पाटील, डॉ. सुखदेव पोटदुखे, प्रा. हरिदास होळकर, डॉ. ललित गोल्डे, डॉ. पठाण, प्रा. लक्ष्मण खरात, प्रा. माठे, ज्ञानेश्वर जाधव, मधुकर राठोड, आदिनी मेहनत घेतली.



