स्वातंत्र्याचं स्वप्न होते उदात्त
घडविले त्यासाठी संविधान
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी
देशास मिळवून दिला स्वाभिमान…
शिकवला त्यांनी हक्कांचा अर्थ
सर्वांना दिला समान अधिकार
विचारांनी पेटली त्यांनी मशाल
बाबासाहेब खरे स्वातंत्र्याचे आधार…
स्वातंत्र्याचा अर्थ झाला स्पष्ट
घटनेत मांडले त्यांनी तत्त्वज्ञान
संविधानरूपी शस्त्र दिले हातात
डॉ.बाबसाहेबच जगात महान…
भारत देशाच्या शिल्पकारांनी
दाखवली लोकशाहीची वाट
दूरदृष्टीचे नसते जर त्यांच्या दान
आजही असता अंधाराचा घाट…
क्रांती झाली पण दिशा नव्हती
दाखवली त्यांनी प्रगतीची वाट
स्वातंत्र्य फक्त घोषणाच नव्हे
डॉ.बाबसाहेबांमुळे देशाचा थाट…
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना
स्वातंत्र्यदिनी करते अभिवादन
लोकशाहीचे रोवले बीज म्हणून
आज आहोत त्यांच्यामुळे आपण…
*©️✒️ संध्या रायठक/ धुतडे*
शिक्षिका, नांदेड