एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला महाविद्यालय बिडकीन या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी डॉ.एस.आर. रंगनाथ यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कला महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे डॉ. शेख मोहसीन सर होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये रंगनाथन यांच्या बाबत केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल सखोल अशी माहिती दिली आणि ग्रंथांना आजकाल वाचक भेटत नाही तर ग्रंथ एकमेकांना भांडत असतील किंवा म्हणत असतील की आपल्याला कोणी वाचत नाही आपण इथेच धूळखात पडलेला आहोत हे खंत त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन आहेर सर यांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणामध्ये सांगितले की असे काही ग्रंथ आहेत की ते जर आपण वाचले तर आपण नक्कीच चांगले नागरिक घडू. इंटरनेटच्या युगात एका क्लिकवर आपल्याला भरपूर माहिती मिळते परंतु जे पुस्तकातून वाचलेलं लक्षात राहते ते मोबाईल वरचे लक्षात राहत नाही त्यामुळे ग्रंथ वाचत चला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन ग्रंथपाल डॉ. अंजली काळे त्यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितले की आपले ग्रंथालय डिजिटल स्वरूपात झालेले आहे आपलं ग्रंथालय खेड्यातलं असलं तरी आजूबाजूंच्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी काही पुस्तके स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घेतलेले आहेत तसेच काही नियतकालिका आहेत ग्रंथालयात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी येऊन ग्रंथांचा उपयोग आपल्या जीवनासाठी करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री अण्णासाहेब थिटे यांनी केले
तर श्री संभाजी आंधळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.