सामाजिक कार्यकर्ता कुंदन लाटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा दलित पँथरतर्फे तीव्र निषेध! हल्लेखोरांना तात्काळ अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर –
दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेबारा वाजल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता कुंदन दिनकर लाटे यांच्यावर साउथ सिटी सिडको-वाळूज मेन रोडवर भ्याड हल्ला करण्यात आला. काही अनोळखी हल्लेखोरांनी गाडी आडवून दगडफेक व हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले असून, हल्लेखोर तोंडाला काळा रुमाल बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटली नाही. हल्लेखोरांकडे बंदुका असल्याचेही लाटे यांनी सांगितले.
या घटनेला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप भारतीय दलित पँथर संघटनेने केला आहे. संघटनेच्या वतीने पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हल्लेखोरांना अटक करण्यात उशीर झाल्यास दलित पँथरतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. लक्ष्मण भुतकर, प्रदेशाध्यक्ष धम्मपाल दांडगे (जिल्हाध्यक्ष), संजय सरोदे, नदीमुद्दीन काजी, अहमद पठाण, आणि भीमराव गाडेकर यांनी सादर केले.



