रमाईंच्या जीवनप्रवासाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले ! रडणारी नव्हे, लढणारी रमाई :
‘मी रमाई’ नाटकाला एकपात्री प्रयोगास देवगाव फाटा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद…
मंठा प्रतिनिधी दि १२ देवगाव फाटा येथे बुद्धभूमी चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रकाश वाघ यांच्या निर्मित ‘मी रमाई’ या एकपात्री नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांच्या भावना भारावून टाकल्या. माता रमाबाई आंबेडकर यांच्या खडतर जीवनप्रवासावर आधारित या प्रयोगाला हाऊसफुल प्रतिसाद मिळाला.
रमाबाईच्या आयुष्यातील संघर्ष, संकटांचा सामना करताना दाखवलेली त्यांची जिद्द, आणि डॉ. बाचासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लक्ष्धात दिलेले खंबीर साथसंगत वा सर्व प्रसंगांची प्रभावी मांडणी रंगमंचावर साकारली गेली.
विशेषतः आपल्या मुलांच्या मृत्यू प्रसंगी रमाईचा आक्रोश दाखवणारा प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यात अबू तरळले. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे रमाई या फक्त रडणाऱ्या नव्हे, तर परिस्थितीशी दोन हात करून लढणान्या वी म्हणून दाखवल्या गेल्या आहेत, अभिनेत्री प्रियांका उबाळे-बाध यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून रमाईच्या जीवनातील प्रत्येक क्षण जिवंत केला. त्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळाली. रडणारी नाही, तर लढणारी रमाई या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही भारतासह जगभरात रमाईंचा प्रेरणादायी संदेश पोहोचवण्याचा मानस
ठेवला आहे, असे अभिनेत्री प्रियांका ज्वाळे-वाघ बांनी सांगितले. या प्रयोगाला पंचवीसहून अधिक
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कला दिग्दर्शक प्रा. रमाकांत भालेराव व चित्रकार देवदास
भंडारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी नाटकाचे कौतुक करताना म्हटले की, प्रियांका यांनी साकारलेली रमाई महणजे खऱ्या अवनि जिवंत इतिहास रंगमंचावर उतरल्याचा अनुभव होता. कार्यक्रमासाठी मंठा आणि जिंतूर तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटक भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खु संघ) कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे उपनगराध्यक्ष अरुण बाघमारे, माजी सभापती तथा कृ.उ.बा. समतीचे संचालक दत्ता बनसोडे, बाळासाहेब अंभीरे, उद्धबभाई सरोदे,
प्रा. आर. एस. गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शरद मोरे, पंथर जिल्हाध्यक्ष रवी सदावर्ते, दादाराव हिवाळे, बालु गायकवाड, बाळु सदावर्ते, पंडीत मस्के, अँड सुनील इंगळे, अभिजीत सदावर्ते, अनिल मोरे, मुकेश काऊतकर, अशोक अवचार, मारुती खनपटे, महेंद्र टेकुळे, आप्पासाहेब सदावर्ते, महादेव सूर्यवंशी, विजेष बाघमारे, भीमराव बाघ आदींनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. ‘मी रमाई’ या नाटकाने केवळ मनोरंजन केले नाही, तर स्त्रीच्या धैर्य, त्याग आणि लढाऊ वृत्तीचा सन्मान करत समाजात प्रेरणा निर्माण होती.



