मोहनराव पाटील यांचा राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मोठा झटका! कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
मलकापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) मलकापूर विधानसभा अध्यक्ष मोहनराव पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये (VBA) जाहीर प्रवेश केला आहे.
हा प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मोहनराव पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.



