spot_img
spot_img
spot_img
spot_img

राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेत परभणी जिल्ह्यातीतून ३५ कलावंत पात्र, दुसऱ्यांदा चाचणीतून पारदर्शक निवड.

परभणी l संजय बगाटे

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने अंतर्गत २०२४- २५ साठी जिल्हा परिषद,परभणी मार्फत साहित्यिक व कलावंतांची प्रत्यक्ष सादरीकरण करून निवड प्रक्रिया दुसऱ्यांदा घेण्यात आली. यात ३५ जण पात्र ठरविण्यात आले.जिल्हाधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष संजय सिंह चव्हाण यांनी कलावंतांना दिलेली ही दिवाळी पूर्वीची भेट ठरली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी २ जुलै रोजी व्हिडीओ चित्रीकरणाह प्रात्यक्षिक प्रक्रिया पार पाडली होती परंतू मागील चार महिन्यांपासून ही विविध कारणामुळे रखडली होती. यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष संजय सिंह चव्हाण यांनी एकाच दिवसात अर्ज पडताळणी प्रत्यक्ष सादरीकरण प्रकिया पूर्ण करून सायंकाळपर्यंत पात्र यादी जाहीर केली.

“राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना” अंतर्गत गुरुवारी १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्हास्तरीय निवड समितीच्या या बैठकीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी समाज कल्याण अधिकारी भोजने, महिला व बालकल्याण अधिकारी काळम,अशासकीय सदस्य म्हणून काशिनाथ उबाळे, शिवाजी सुक्ते, अनंत गोलाईत, संदीप राठोड हे सुद्धा मूल्यमापन समितीमध्ये उपस्थित होते.
दिवसभरात ८१ कलावंताचे सादरीकरण झाले यात पूर्णवेळ जिल्हाधिकारी हजर होते. आणि त्याच दिवशी सायंकाळीच विविध क्षेत्रातील ,३५ कलावंतांची निवड करून यादी घोषित केली.
कागदपत्र पडताळणी व सादरीकरणानुसार निवड केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत
श्यामराव कोंडीबा नारळे, टाकळी (निलवर्ण) ता. परभणी -अभंग, मनमथप्पा नागनाथप्पा खाके, चारठाणा ता. जिंतूर- भजन, शांतीलाल छबिलदास धुमाळ, खानपूर नगर, पिंगळी रोड, परभणी-किर्तन, ढवळे महादेव शेषराव,रायपूर, हातणूर, ता. सेलू- किर्तन/कबीर, कमलाजी किशनराव कवळे, अंबाभवानी नगर -स्वच्छता गीत, विठ्ठल दौलतराव कांबळे, देवळा पुनर्वसन वाकी-बॅन्ड, सदाशिव पुंजाजी बेले गादाडगव्हाण वाडी ता. जिंतूर- वादक, दिलीप बाळिराम बनकर, वर्मा नगर -छायाचित्रकार, श्रीरंग नामदेव सोनटक्के पिंपळगाव ता. पालम जि. परभणी -गायन (भ्रूणहत्या), दैवशाला देवीदास खिलारे, गादाडगव्हाण- दारुबंदी गीत, कचरू धोंडीबा पारखे, परभणी- बॅन्ड, लक्ष्मण रंगनाथ कदम, गौतम नगर, पाथरी ता. पाथरी- भिमगीत, नागनाथ लक्ष्मणराव ब्याळे, काळगाव, ता. पुर्णा- देशभक्ती गीत, प्रकाश कोंडीबा कांबळे, शिवाजी नगर, मानवत – गायन/पेटी, बाळासाहेब देवराव कीर्तने, पंचशील नगर, परभणी- भिमगीत, विमलबाई ज्ञानोबा ढवळे, भीम नगर पाथरी ता.- भिमगीत, रखमाजी नागोराव कदम, टाकळी खु. ता. जि. परभणी-गोंधळ,मदनराव राधाकिशन कदन, जिजामाता रोड, गोंधळी गल्ली, परभणी-गोंधळ जागरण, लता ज्ञानोबा साळवे, लोकमान्य नगर-लावणी नृत्य, बाळासाहेब गंगाराम सोनवणे, बोरी -गोंधळ, शेख अजीस शेख रज्जाक, रेहमान नगर -कव्वाली संगीतकार, मुंजाजी शंकर खंदारे, सारंगपूर ता. मंगरूळ बु. ता. मानवत – एकतारी, वारू माळबाजी तळिकुटे, खाडी ता. पालम- सारंगी, रेखा विनोद कणकुटे गंगाखेड रोड, तादेश्वर नगर, परभणी-लावणी नृत्य, बाबुराव सोनाजी सातपुते, एरंडेश्वर ता. पुर्णा- गोंधळ, सुभाष विठ्ठल चव्हाण,आडगाव तांडा, आडगाव खांडगळे -वासुदेव, शिवराम यशवंत पाचंगे, पाडेगाव -गोंधळ, मोहम्मद सलिम मोहम्मद कडतोजी कुरेशी, वांगी रोड, परभणी- वादक, वर्षा यशवंतराव फड, दर्गा रोड, कुरबान अली शाह नगर, परभणी- लावणी नृत्य, शेख सुलताना शेख सलीम, इंदिरा नगर, पाथरी- हळदी/मेंहदी गीत, विठ्ठल दिगंबर गोरकट्टे, लोहा- लोक शाहीर, बाबुराव विठ्ठलराव चव्हाण, आडगाव खांडगळे ता. जिंतूर- वासुदेव, प्रल्हाद विठ्ठल चव्हाण, आडगाव खांडगळे ता. जिंतूर- वासुदेव, प्रभाकर शंकर डाहे शिवाजी नगर, मानवत- खंजेरी/दिमडी, निवृत्ती मारिबा सिरसाठ यांचा समावेश आहे.

Epaper Website

Related Articles

राजकीय पक्षांना थेट आव्हान,जेलची भीती बाळगू नका, प्रकाश आंबेडकर

मुबई : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत...

अंजलीताई आंबेडकर यांची नांदेडमध्ये सक्षम ताटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट; “न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत आहोत” – ठाम भूमिका

नांदेड – सक्षम ताटे हत्या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले असताना, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!