- परभणी l प्रतिनिधी (संजय बगाटे)
नव्यानेच वंचित बहुजन आघाडी उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून झालेल्या प्रमोद कुटे यांनी पक्ष बळकटीसाठी पाऊल उचलले अडून यांच्या नरेश टॉकीजच्या जवळ जिंतूर रोडवर जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन २६ ऑक्टोंबर रोजी रविवारी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा जिल्हा समन्वयक अशोक भाऊ सोनीने यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रमोद कुटे यांनी दिली.
उत्तर विभागातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत तालुक्यांच्या अध्यक्षांच्या मुलाखती घेऊन निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा परभणी जिल्हा समन्वयक अशोक भाऊ सोनोने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या दिवशी वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उत्तर व दक्षिण विभागाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांसह सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे तसेच शहर कार्यकारिणीचे स्वागत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ, फुले-शाहू-आंबेडकर विद्वत सभा तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारी १२ वाजता सावली विश्रामगृह येथे तालुका अध्यक्षांच्या मुलाखती व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष (उत्तर) प्रमोद भाऊ कुटे, जिल्हा महासचिव (उत्तर परभणी) शिवाजी वाकळे आणि मुजफ्फर खान यांनी दिली.



