spot_img
spot_img
spot_img
spot_img

हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांचा जागतिक गजर – वर्ल्ड पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक.!

 


हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांचा जागतिक गजर – वर्ल्ड पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक!

छत्रपती संभाजीनगर :दि. २०
ग्रामीण पोलीस दलातील हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश मिळवत भारताचा मान उंचावला आहे. अमेरिकेतील बिरमिंघम, अलाबामा (USA) येथे 26 जून ते 7 जुलै 2025 दरम्यान झालेल्या 21 व्या वर्ल्ड पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्स या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्यांनी पॉवर लिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदक तसेच बेंच प्रेस प्रकारात कांस्यपदक जिंकले.

या गौरवशाली कामगिरीबद्दल मा. संजयजी सिरसाठ, पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री यांनी 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. “साळवे यांनी केवळ पोलीस दलाचं नव्हे, तर महाराष्ट्र आणि भारताचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केलं आहे” असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

या स्पर्धेत जगभरातील 90 पेक्षा अधिक देशांतील पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कौशल्य, फिटनेस आणि शौर्य यांचे प्रतीक असलेल्या या स्पर्धेत साळवे यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.

सध्या वैजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले साळवे यांनी याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताचा लौकिक वृद्धिंगत होत आहे.

या प्रसंगी मा. जितेंद्र पापळकर (विभागीय आयुक्त), वीरेंद्र मिश्रा (विशेष पोलीस महानिरीक्षक), दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी), डॉ. विनयकुमार राठोड (पोलीस अधीक्षक) व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग यांनीही साळवे यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

Epaper Website

Related Articles

राजकीय पक्षांना थेट आव्हान,जेलची भीती बाळगू नका, प्रकाश आंबेडकर

मुबई : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत...

अंजलीताई आंबेडकर यांची नांदेडमध्ये सक्षम ताटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट; “न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत आहोत” – ठाम भूमिका

नांदेड – सक्षम ताटे हत्या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले असताना, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!