१२ ऑगस्टचा दिवस… देशभरातला प्रत्येक ग्रंथालय, लहानसं असो की भव्य, त्या दिवशी एका वेगळ्या च उमेदीने उजळून निघालं होतं. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ हा केवळ दिनदर्शिकेतील एक औपचारिक नोंद नव्हती; ती होती ज्ञानाचा, संस्कृतीचा आणि मानवी संवादाचा उत्सव. शाळांच्या वाचनकक्षात मुलांच्या डोळ्यांत चमक होती, महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये नवीन पुस्तकांच्या सुवासाने हवा भरली होती, तर संशोधन संस्थां च्या हॉलमध्ये विचारांच्या नवीन दिशा खुल्या होत होत्या. कुठे प्रेरणादायी व्याख्या नं झडली, कुठे दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाने उत्सुकतेची लाट उसळली. काही ठिकाणी हा दिवस फक्त ग्रंथपालांचा गौरव करण्या पुरता न राहता, वाचनाच्या सामर्थ्याचा, ज्ञानाच्या प्रवाहाचा आणि मानसिक आरोग्याला स्पर्श करणाऱ्या साहित्याच्या अद्भुत शक्तीचा उत्सव बनला. कारण आजच्या जगात ग्रंथालय म्हणजे फक्त पुस्तकांचे संग्रहालय राहिलेले नाही; ते मनाची शांती, मानसिक संतुलन आणि वैचारिक समृद्धी घडविणारे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. ग्रंथालयाची संकल्पना मानव इतिहासा इतकीच जुनी आहे. प्राचीन काळी ताडपत्रांवर, भुर्ज पत्रांवर जतन केलेली हस्तलिखिते असोत, की नंतरच्या काळात छापील ग्रंथांचे संग्रह, ग्रंथालय नेहमीच ज्ञानसंपत्तीचे केंद्र राहिले आहे. पण काळाच्या ओघात त्याचा चेहरामोहरा बदलला. माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांनी ग्रंथालयांना फक्त भिंतीत बसवलेले कपाट न ठेवता, जगभर पसरलेल्या माहिती जाळ्याशी जोडले. त्यामुळे ज्ञानाच्या शोधात असलेल्या कुणालाही, तो संशोधक असो, विद्यार्थी असो किंवा सामान्य वाचक असो त्याच्या गरजेप्रमाणे साधनसंपत्ती उपलब्ध झाली. मात्र या डिजिटल लाटेतही एक गोष्ट स्पष्ट झाली कि, मानवाला फक्त माहिती पुरेशी नसते; त्याला मानसिक आथार, भावनिक स्थैर्य आणि जीवनाच्या गुंतागुंतीतून मार्ग शोधण्या साठी योग्य साहित्यही लागते.
याच ठिकाणी “बिब्लि ओथेरपी’ ही संकल्पना विशेष महत्त्वाची ठरते. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, बिब्लि ओथेरपी म्हणजे वाचनाद्वारे उपचार, यामध्ये योग्य प्रकारचे साहित्य वाचून व्यक्तीला मानसिक, भावनिक किंवा वर्तणुकीसंबंधी अडचणींवर मात करण्यात मदत केली जाते. ही पद्धत नव्या ने उदयास आलेली नाही; दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत रुग्णालयांमध्ये ग्रंथपालांनी जखमी सैनिकांसाठी पुस्तके निवडून देण्याची परंपरा सुरू केली होती. त्या काळी वाचन हे जखमा फक्त शरिरावरच नव्हे तर मनावरही भरून काढण्या चे साधन ठरले. आजही वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि पुनर्वसन केंद्रांमध्ये बिब्लि ओथेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. बिब्लि ओथेरपीची प्रक्रिया साथी वाटली तरी ती अत्यंत विचारपूर्वक राबवावी लागते. कारण प्रत्येक वाचकाची भावनिक गरज वेगळी असते. एखाद्या व्यक्तीला प्रेरणादायी साहित्य हवे असते, तर दुसऱ्याला काल्पनिक कथांमधून जीवनातील वेदना विसरायला आवडते. काहींना स्व-मदत्तपर (Self-help) पुस्तकां मधून मानसिक ताकद मिळते, तर काहींना कवितांमधून स्वतःशी संवाद साधता येतो. यासाठी ग्रंथपाल आणि मानसिक आरोग्य तज्ञ यांचे एकत्रित कार्य महत्त्वाचे ठरते. योग्य पुस्तक योग्य वाचकापर्यंत योग्य वेळी पोहोचवणे हेच बिब्लि ओथेरपी चे खरे यश आहे.
आजच्या काळात ताणतणाव, नैराश्य, चिंता या मानसिक समस्या सर्वच क्षेत्रांत वाढताना दिसतात. विद्यार्थ्यांपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत, गृहिणींपासून ते निवृत्त व्यक्तींपर्यंत सर्वांनाच मानसिक स्थैर्याची गरज आहे. बिब्लि ओथेरपी हा एक असा मार्ग आहे, जो कोणताही दुष्परिणाम न घडवता, वाचनाच्या आनंदातून मानसिक आरोग्य सुधारण्याची संधी देतो. ग्रंथालये यात प्रमुख भूमिका निभावू शकतात. पुस्तक प्रदर्शन, वाचन मंडळे, साहित्य चर्चा गट, विषयानुरूप पुस्तक यादी या सगळ्या गोष्टी बिब्लि ओथेरपीला पूरक ठरतात. डिजिटल माध्यमांनी या संकल्पनेला नव्या शक्यता दिल्या आहेत. ऑडिओ बुक्स, ई-बुक्स, पॉडकास्ट, ऑनलाईन वाचन गट हे सर्व बिब्लि ओथेरपीच्या व्या प्तीला जागतिक स्तरावर पोहोचवत आहेत. ग्रामीण भागातील किंवा शारीरिक अडचणी असलेल्या वाचकानाही आता वाचन उपचार सहज उपलब्ध होऊ शकतो. मात्र या सगळ्यात मानवी स्पर्श, योग्य साहित्य निवडीचा अनुभव, आणि वाचकाच्या भावनिक गरजांचा अंदाज ही तीन गोष्टी केवळ प्रशिक्षित ग्रंथपालच देऊ शकतो. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन फक्त एक औपचारिकता म्हणून न पाळता, तो वाचन संस्कृतीच्या नव्या वाटचालीचा, मानसिक आरोग्याच्या चर्चेचा आणि ग्रंथालयांच्या सामाजिक जबाबदारीचा उत्सव बनवायला हवा. कारण पुस्तक केवळ ज्ञान देते असे नाही ते मनाला स्पर्श करते, विचारांना चालना देते, आणि जीवनातील कठीण प्रसंगातून वाट काढण्याची शक्ती ही देते. बिब्लि ओथेरपी ही त्याच शक्तीचा अभ्यासपूर्ण वनियोजित वापर आहे.
अलिकडेच साजऱ्या झालेल्या ज्ञानसेवेच्या गौरव दिनाने’ आपण पुस्तकांच्या जगातल्या या शांत, पण अमूल्य योद्धयां कडे पुन्हा एकदा नजर वळवली आहे. ग्रंथपाल म्हणजे केवळ रजिस्टरमध्ये पानं उलटणारा अधिकारी नव्हे; तो म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ, माहितीच्या समुद्रात दिशादर्शक दीपगृह, आणि मनाच्या अंधान्या कडा उजळवणारा सल्लागार, आजच्या डिजिटल वादळात त्याची भूमिका अधिक धाडसी झाली आहे ऑनलाईन डेटाबेस, ई-पुस्त के, मुक्त प्रवेश जर्नल्स यांच्या तरंगांवर स्वार होऊन तो वाचकांना योग्य किनाऱ्यावर पोहोचवतो, पण एवढ्या वरच तो थांबत नाही; मानसिक आरोग्याच्या नाजूक प्रदेशातही तो बिब्लि ओथेरपी’ च्या शक्ती ने प्रवेश करतो, जिथे शब्द हे फक्त ज्ञानाचे नाही तर उपचाराचे औषध बनतात. पुस्तकांच्या श्वासात गुंफलेली ही सेवाभावाची धडधड, कदाचित त्याच्या सारख्या अदृश्य योद्ध्या शिवाय आपण अनुभवूच शकत नाही.
(लेखक हे एस एम बी टी वैद्यकीय महाविद्यालयात ग्रंथपाल आहे)