गुहागर दि. १२ (रामदास धो. गमरे) बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर या पतसंस्थेचा प्रथम वर्धापनदिन व पतसंस्थेचा विशेषांक प्रकाशन सोहळा अश्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता पतसंस्थेचे अध्यक्ष काशिराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर बाजार हॉल (संत तुकाराम महाराज सभागृह) पेट्रोल पंपासमोर, शृंगारतळी, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराड, सेवक प्रशिक्षण संशोधन केंद्र, विद्यानगर, कराडचे प्रा. अजित शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते संचालक / सभासद यांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी व सहकारी कायद्यातील तरतुदी, आर्थिक पत्रकांचे विश्लेषण आणि एन. पी. ए. व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.