- (छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी, निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) गरीब जनतेसाठी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे.येथे डॉक्टरामार्फत मोफत सल्ला व उपचार तसेच रक्त निदान चाचणी.
सर्व प्रकारच्या तपासण्या व रोज दुपारी २ वाजे पासुन रात्री १० वाजे पर्यंत डॉक्टर मार्फत तपासणी करून मोफत औषधी व रक्त निदान चाचण्या करण्यात येते.
आपला दवाखाना चे वैशिष्ट्य :
संगणकृत रुग्णांचा डेटा आणि आरोग्य नोंदींसाठी पूर्णपणे सुसज्ज आयटी पायाभूत सुविधा
मूलभूत वैद्यकीय उपभोग्य वस्तू आणि आवश्यक वैद्यकीय पुरवठा उपलब्ध.
प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे
सर्व आवश्यक औषधे मोफत
गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी.
मानसिक आरोग्य सल्ला.
राष्ट्रीय लसीकरण. वेळापत्रकाअंतर्गत मोफत लसीकरण.
सामुदायिक गरजांवर आधारित इतर आवश्यक आरोग्य सेवा
महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी गर्भवती महिला व पाच वर्षाच्या आतील मुलांसाठी लसीकरणाची सोय इत्यादी सेवा देण्यात येत आहे.